बाणेर :
पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ (बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सुस, महाळुंगे) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कार्याध्यक्ष – राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी पुणे शहर तसेच अध्यक्ष – वामा वुमन्स क्लब, सौ. पूनम विशाल विधाते यांनी व्यापक जनसंवाद मोहीम राबविली.
या मोहिमेदरम्यान त्यांनी प्रभागातील विविध परिसरांमध्ये भेट देत ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनी, युवक, महिला बचतगट, व्यावसायिक आणि स्थानिक नागरिक यांच्याशी थेट चर्चा केली. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी, प्रभागातील विकासकामे आणि प्राधान्यक्रमाविषयी त्यांनी सविस्तर संवाद साधला. या वेळी माजी नगरसेविका सुषमा निम्हण यांनी देखील नागरिकांशी संवाद साधला.
जनसंवादातून नागरिकांनी वाहतूक कोंडी, रस्त्यांची सुधारणा, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, महिला सुरक्षा, आरोग्य सेवा, उद्याने व क्रीडा सुविधा, अंगणवाडी आणि शैक्षणिक गरजा या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली मते नोंदवली. सौ. विधाते यांनी सर्व सूचना मनापासून ऐकून त्यांची नोंद केली आणि योग्य ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या जनसंवाद मोहिमेला प्रभागातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. विविध समाजघटकांकडून सौ. विधाते यांना मिळणारा पाठिंबा त्यांच्या कार्यावरचा विश्वास दर्शवितो.
सौ. पूनम विशाल विधाते या प्रभाग क्रमांक ९ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अधिकृतपणे इच्छुक असून, महिलांचे सक्षमीकरण, नागरिकाभिमुख प्रशासन, युवकांसाठी संधी आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास ही आपली मुख्य ध्येयं असल्याचे त्यांनी सांगितले.
सौ. विधाते म्हणाल्या, “प्रत्येक नागरिकाचा आवाज माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. या जनसंवाद मोहिमेतून प्रभागातील लोकांच्या अपेक्षा आणि गरजा अधिक स्पष्टपणे जाणून घेता आल्या. तुमच्या आशीर्वादाने प्रभागाचा विकास प्रामाणिकपणे आणि वेगाने करण्याचा माझा संकल्प आहे.”
या जनसंवाद मोहिमेमुळे प्रभाग क्रमांक ९ मध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून आगामी निवडणुकीत त्यांची इच्छुक म्हणून भक्कम उपस्थिती स्पष्ट दिसत आहे.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी