पाषाण :
भारतीय जनता पार्टी – युवा मोर्चा, पुणे शहर तसेच कोकाटे तालीम मंडळ ट्रस्ट आणि कृष्णगंगा सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मा. खासदार केंद्रीय राज्यमंत्री श्री. मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
थॅलेसिमिया रुग्णांसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या रक्तपुरवठ्यास हातभार लावण्यासाठी हे विशेष रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत असून नागरिकांना या उपक्रमात उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे.
📅 दिनांक: रविवार, १६ नोव्हेंबर २०२५
🕒 वेळ: सकाळी ९ ते रात्री ९
📍 स्थळ: रोहन कोकाटे भाजपा कार्यालय, शिवांजली हॉटेल जवळ, बालाजी चौक, पाषाण, पुणे
“थॅलेसिमिया रुग्णांसाठी तुमचं रक्त म्हणजे नव्या आशेचा श्वास” या भावनेतून रक्तदान करून समाजातील गरजू रुग्णांना नवीन जीवन देण्याची ही एक उत्तम संधी असल्याचे भाजपा युवा मोर्चाचे पुणे शहर सरचिटणीस रोहन कोकाटे यांनी सांगितले.
शिबिराचे मार्गदर्शन आणि समन्वय भाजपा युवा मोर्चा पुणे शहराचे सरचिटणीस श्री. रोहन रोहिदास कोकाटे आणि सौ. ऐश्वर्या रोहन कोकाटे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
📞 ९७६७३८२९२९ / ९१६८३८२९२९
या सामाजिक उपक्रमात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदानाच्या माध्यमातून मानवसेवेचा संदेश बळकट करावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.




























More Stories
*‘विनायकी’ विनायक निम्हण शिष्यवृत्ती म्हणजे समाज घडवणारी योजना : पद्मविभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार*
लोकशाही संस्कारांचा अनोखा उपक्रम; विद्यापीठ हायस्कूलमध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात
कोथरूड विधानसभा मधील पाषाण-सुतारवाडी लिंक रोड वरील कचऱ्यावरून राजकारण पेटले! अमोल बालवडकरांच्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे; पण तत्परता फक्त ‘खास’ भागापुरतीच का?