February 5, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सूस शाखेच्या पेरीविंकल ज्युनियर कॉलेज ची E.V. S. प्रकल्पासाठी भोर येथे निसर्गरम्य परिसरातील फुलपाखरांच्या गावी शैक्षणिक क्षेत्र भेट!!!

सूस :

ज्ञान, निसर्ग आणि आनंदाचा संगम – पिसवरे (भोर) येथील शैक्षणिक सहल!* चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, सुस यांच्या वतीने आज दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी इयत्ता ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी पिसवरे (भोर) येथे एक दिवसीय शैक्षणिक सहल मोठ्या उत्साहात पार पडली.

पिसवरे हे महाराष्ट्रातील भोर तालुक्यातील निसर्गरम्य गाव असून तेथील हिरवेगार डोंगर, स्वच्छ हवा आणि शांत वातावरण विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सान्निध्यात घेऊन गेले. या परिसरात ९० हून अधिक प्रजातींची फुलपाखरे, विविध कीटक आणि पक्षी आढळतात. विद्यार्थ्यांनी या जैवविविधतेचे प्रत्यक्ष निरीक्षण करून निसर्ग आणि विज्ञानातील संबंध अधिक जवळून अनुभवले.

सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी भाटघर धरणाचे नयनरम्य दृश्य पाहिले. आजूबाजूचा परिसर हिरवाईने नटलेला असल्याने विद्यार्थ्यांनी थंडगार हवेत निसर्ग निरीक्षण आणि छायाचित्रणाचा आनंद घेतला. निसर्गाच्या सान्निध्यात त्यांनी ज्ञानासोबत आनंद व प्रेरणा अनुभवली.

या सहलीचा उद्देश विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवन, शेती पद्धती, पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेबद्दल प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देणे हा होता. मार्गदर्शक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना परिसरातील वनस्पती, पक्षी आणि फुलपाखरांबद्दल सविस्तर माहिती दिली.

शाळेतून सकाळी ५.०० वाजता बसचे प्रस्थान झाले तर सायंकाळी ४.०० वाजता सर्व विद्यार्थी आनंदाने परतले. विद्यार्थ्यांसाठी नाश्ता, चहा आणि जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. सर्व विद्यार्थी स्वच्छ गणवेशात, शिस्तीने आणि उत्साहाने सहभागी झाले.

या सहलीचे विशेष मार्गदर्शन कॉलेजचे विभागप्रमुख श्री. सचिन खोडके यांनी विद्यार्थ्यांना केले. त्यांनी पिसवरे परिसरातील निसर्गवैविध्य व पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

या संपूर्ण सहलीचे आयोजन संस्थेचे माननीय संस्थापक श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल, शिवानी बांदल आणि निर्मल पंडित यांच्या प्रेरणेतून करण्यात आले. या सहलीसाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित, पर्यवेक्षक श्री. सचिन खोडके, पर्यवेक्षिका सौ. स्मिता श्रीवास्तव आणि सौ. नेहा माळवदे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.

कॉलेजच्या सर्व शिक्षकांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. त्यांच्या सहकार्यामुळे ही सहल अत्यंत यशस्वी, ज्ञानवर्धक आणि संस्मरणीय ठरली.

पिसवरेचे नैसर्गिक सौंदर्य, भाटघर धरणाचे दृश्य आणि जैवविविधतेचा अनुभव विद्यार्थ्यांच्या मनात कायमचा ठसा उमटवून गेला. या सहलीमुळे विद्यार्थ्यांना ज्ञान, निसर्ग आणि आनंदाचा अद्भुत संगम लाभला.