पाषाण :
सामाजिक बांधिलकी जपत श्री वाकेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ, पाषाण यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ₹७५,००० रकमेचा धनादेश पुणे जिल्हाधिकारी श्री जितेंद्र दुडी यांना सुपूर्त केला.
मराठवाडा परिसरात झालेल्या पूरपरिस्थितीमुळे नागरिकांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने संघाच्या सभासदांनी स्वेच्छानिधी जमा केला. या निधीचे रूपांतर करून पंचाहत्तर हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्त करण्यात आला.
या प्रसंगी संघाचे अध्यक्ष श्री हरीशभाई पाठक, उपाध्यक्ष श्री रमेश जोशी, सचिव श्री रत्नाकर मानकर, खजिनदार श्री गोपाळ निजसुरे उपस्थित होते. तसेच या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. कल्याणी टोकेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
जिल्हाधिकारी श्री जितेंद्र दुडी यांनी या सामाजिक उपक्रमाचे व ज्येष्ठ नागरिकांच्या संवेदनशीलतेचे विशेष कौतुक केले व सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की, “समाजातील प्रत्येक घटकाने अशा प्रकारे पुढाकार घेतल्यास आपत्तीग्रस्तांना दिलासा मिळण्यास मोठी मदत होते.”
या उपक्रमातून श्री वाकेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाने समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी आणि संवेदनशीलता यांचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी