September 19, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पाषाण येथे प्रथमच रोहन कोकाटे यांच्या वतीने अवधूत गांधी यांचा ‘भक्ती-शक्ती संगम’  ‘देह विठ्ठल’ गाण्यांचा कार्यक्रमाचे आयोजन..

पाषाण :

कृष्णगंगा सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘दीवाळी संध्या – भक्ती-शक्ती संगम’ या कार्यक्रमात ‘देह विठ्ठल’ हा भावस्पर्शी गाण्यांचा भक्तिमय सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन श्री. रोहन रोहिदास कोकाटे (मा. अध्यक्ष – भाजपा युवा मोर्चा कोथरूड विधानसभा, अध्यक्ष – कृष्णगंगा सोशल फाउंडेशन) आणि सौ. ऐश्वर्या रोहन कोकाटे (सदस्या – कृष्णगंगा सोशल फाउंडेशन) यांच्या संकल्पनेतून करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक, गीतकार आणि हरिपाठिक मा. श्री. अवधूत गांधी यांच्या गाण्यांचा भक्तिमय सोहळा होणार असून, त्यांनी संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत एकनाथ महाराज यांच्या वाणीचा गोडवा अनुभवणाऱ्या रसिकांसाठी विशेष गाणी सादर करणार आहेत.

📅 रविवार, दिनांक १९ ऑक्टोबर २०२५
🕕 सायं. ६:०० वा.
📍 स्थान : जानवी मंगल कार्यालय, पाषाण सुस रोड, पुणे

कार्यक्रमाचे आयोजन श्री. रोहन रोहिदास कोकाटे (मा. अध्यक्ष – भाजपा युवा मोर्चा कोथरूड विधानसभा, अध्यक्ष – कृष्णगंगा सोशल फाउंडेशन) आणि सौ. ऐश्वर्या रोहन कोकाटे (सदस्या – कृष्णगंगा सोशल फाउंडेशन) यांच्या संकल्पनेतून करण्यात आले आहे

दीवाळीच्या आनंदात भक्तीचा आणि अध्यात्माचा संगम घडवणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या दिव्य कीर्तनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोहन कोकाटे यांनी केले आहे.

 

You may have missed