February 5, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सुरांनी उजळली संपूर्ण सूस नगरीत पेरीविंकल ची दिवाळी पहाट!

सूस :

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल ॲन्ड ज्युनियर कॉलेजच्या सूस शाखेतील संगीत मैफलीने भारले वातावरण. शनिवार, दिनांक १८ ऑक्टोबर २०२५ रोजी पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सुस येथे ‘दिवाळी पहाट २०२५’ हा सांस्कृतिक सोहळा सळसळत्या उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांचे स्वागत व सरस्वती–धन्वंतरी पूजनाने झाली. यानंतर पाहुण्यांचा मनःपूर्वक सत्कार करण्यात आला. त्यानंतर दिवाळीच्या महत्त्वावर भाषण आणि उद्घाटनपर अभिवचनांनी वातावरण मंगलमय झाले.
“सूर सवेर” या दिवाळी पहाट च्या कार्यक्रमात
शिक्षकांनी जुनी-नवी गाणी, भावगीत, भक्तिगीते आणि कविता सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. एक से बढकर एक परफॉर्मन्स ने सर्व वातावरण व पहाट मंत्रमुग्ध झाले. त्यात अजून कार्यक्रमाला रंगत व बहार आली ते म्हणजे शाळेच्या संचालिका सौ रेखा बांदल यांनी गायलेल्या सत्यम शिवम सुंदरा या सुमधुर गीताने. तसेच मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित व HOD सचिन खोडके यांनी गायलेल्या गुनगुना रहे है या द्वंद्व गीताने कार्यक्रमाला रंगत चढली. मुख्याध्यापिका यांच्या समवेत सर्व शिक्षकवृंद व त्यांच्या सुमधुर आवाजाने संपूर्ण विद्यालय दुमदुमून गेले.

🍬 बोनस आणि मिठाईचे वितरण

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व शिक्षकांना दिवाळी बोनस व मिठाईचे वाटप करण्यात आले. हे वाटप संस्थेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ. रेखा बांदल, मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित व संचालिका सौ. शिवानी बांदल यांच्या हस्ते करण्यात आले. या क्षणी संपूर्ण परिसर आनंद, कौतुक आणि समाधानाने भरून गेला.

या दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना व शिक्षकांना एकतेचा, आनंदाचा आणि संस्कृतीच्या जतनाचा संदेश मिळाला. संगीत, काव्य आणि प्रार्थनेच्या माध्यमातून सर्वांनी आनंदाने सृजनशीलता आणि एकात्मतेचा प्रकाश पसरवण्याची प्रेरणा घेतली.

🌸 “या दीपोत्सवात आनंद, प्रेम आणि मैत्रीचे दिवे प्रत्येक मनात प्रज्वलित होवोत!” असे प्रतिपादन करत शाळेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन सर्वांनी बुद्धिबळासारखे जीवन जगण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करावे असे सांगून बुद्धिबळातील प्रत्येक घराचा जीवनाशी असलेला पूरक संबंध त्यांच्या भाषणातून अतिशय कल्पकतेने सांगितला.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ. रेखा बांदल शिवानी बांदल व सौ निर्मल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांच्या अचूक नियोजनाने व पर्यवेक्षक नेहा माळवदे यांच्या सुसुत्रतेने व समन्वयाने तसेच श्री. सचिन खोडके, स्मिता श्रीवास्तव यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला. नर्सरीपासून ते कॉलेजपर्यंत सर्व शिक्षक उपस्थित राहून उत्साहाने सहभाग घेतला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सचिन खोडके, हेमलता नाईक यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले.

पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सुस यांच्या व्यवस्थापन व शिक्षकवर्गाकडून सर्वांना हार्दिक दिवाळी शुभेच्छा देत कार्यक्रम अत्यंत उत्साहाने व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला.