बालेवाडी :
बालेवाडी परिसरातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी! ऋग्वेद अपटाऊन सोसायटीबाहेरील दीर्घकाळ प्रतीक्षित रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले असून, या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोसायटीतर्फे पुणे महानगरपालिकेचे मा. स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल दादा बालवडकर तसेच पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांचा सन्मान सोसायटीतर्फे करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे म्हणाले की, “हा सन्मान फक्त आमचा नसून हा नागरिकांच्या आपुलकीचा आणि विश्वासाचा सन्मान आहे. प्रत्येक सोसायटीमधील नागरिकांना चांगल्या सुविधा आणि मूलभूत सोयी मिळाव्यात, हेच आमचं ध्येय आहे.”
रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, या उपक्रमाबद्दल ऋग्वेद अपटाऊन सोसायटीतील सर्व नागरिकांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमात सोसायटीचे पदाधिकारी, रहिवासी आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी