औंध :
भारतीय जनता पक्ष औंध-बोपोडी आणि पुणे शहर टपाल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सौरभ कुंडलिक यांच्या संपर्क कार्यालय येथे ६ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आधार कार्ड शिबिर आणि सुकन्या समृद्धी योजना खाते उघडण्याचे शिबिर आयोजित करण्यात आले होते .
या शिबिरात नागरिकांसाठी नवीन आधार कार्ड नोंदणी, आधार कार्ड दुरुस्ती, तसेच आधारला मोबाईल क्रमांक लिंक करणे या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच, सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत १० वर्षाखालील मुलींसाठी खाते उघडण्याची सुविधा साईराम महिला बचतगट तर्फे प्रदान करण्यात आली.
या योजनेत एका आर्थिक वर्षात किमान रु. १००० ते कमाल रु. १.५ लाख इतकी रक्कम जमा करण्याची तरतूद आहे. या पाच दिवसांच्या शिबिरादरम्यान एकूण १४१ नागरिकांनी विविध सेवांचा लाभ घेतला. नागरिकांच्या आधारकार्ड संबंधित समस्याने निवारण शिबिरात करण्यात आले. त्याच बरोबर शहरातील अनेक पाल्यांनी आपल्या मुलींच्या सुकन्या समृद्धी योजना खात्यांची नोंदणी केली.
शिबिराचे उद्दिष्ट नागरिकांना आवश्यक शासकीय सेवा त्यांच्या परिसरातच सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देणे हे होते. भविष्यातही अशा सामाजिक व उपयुक्त उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे सौरभ कुंडलिक यांच्याकडून सांगण्यात आले.



More Stories
पुणे आयडॉल २०२६ ची महाअंतिम फेरी १० मे रोजी बालगंधर्व येथे – ५६० स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘व्हॉइस ऑफ चॉईस’ विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार
राजभवन (लोकभवन) मार्ग विस्तारीकरणाला गती; कामाचा शुभारंभ, वाहतूक कोंडीवर लवकरच दिलासा – नगरसेवक सनी निम्हण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा