बाणेर, म्हाळुंगे :
अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या “मिशन निर्मल” स्वच्छता अभियानाचा २० व २१ वा दिवस बाणेर व म्हाळुंगे परिसरात उत्साहात पार पडला.
बाणेरमधील योगी पार्क (लेन क्र. १, २, ३, ४), ननावरे चौक, पेरिविंकल सोसायटी, पिओनी सोसायटी, भ्रूम बंगला, रोजरी अपार्टमेंट्स, युगल स्टुडिओ १६, व्यंकटेश व्हिला, संकल्प रेसिडेन्स, कृपा सिंधू अपार्टमेंट्स, सिल्व्हर डेल, अर्बन ब्लिस, इंद्रप्रस्थ बंगला, कृष्णा मेडिकल समोरील दोन लेन, समर्थ कॉलनी, प्रेरणा अपार्टमेंट, स्प्रिंग फील्ड अपार्टमेंट्स, भूपती बंगला, इशान्य रेसिडेन्स, राजमंगल, साई ज्ञान अपार्टमेंट्स, स्वप्नदीप बंगला, साई वाटिका, कपिला आदी परिसरात आज सकाळपासून स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि अमोल बालवडकर फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला. या उपक्रमाद्वारे “आपला परिसर, स्वच्छ परिसर” हा संदेश देत नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली.
दरम्यान, म्हाळुंगे गावठाण परिसर आणि मुख्य रस्त्यावरही “मिशन निर्मल” स्वच्छता अभियान उत्साहात पार पडले. नागरिकांनी स्वतःहून कचरा गोळा करून परिसराची साफसफाई केली. स्वच्छतेसोबतच जनजागृतीचेही आयोजन करण्यात आले.
अमोल बालवडकर फाउंडेशनच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे बाणेर-म्हाळुंगे परिसरात स्वच्छतेबाबतचा दृष्टीकोन सकारात्मक बदलताना दिसत असून, नागरिकांमध्ये “स्वच्छता हीच खरी सेवा” हा संदेश दृढ होत आहे.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी