February 4, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

मानवतेचा दीप उजळवत शिवसैनिक डॉ. दिलीप मुरकुटे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक ९ मध्ये दिवाळी सरंजाम वाटप सोहळा संपन्न..

पाषाण :

प्रभाग क्रमांक ९ — बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे, पाषाण, सोमेश्वरवाडी आणि सुतारवाडी परिसरासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे शिवसैनिक डॉ. दिलीप भाऊ मुरकुटे यांच्या वतीने बाणेर-पाषाण लिंक रोडवरील बालाजी चौक येथे दिवाळी सरंजाम वाटप तसेच स्व. सिंधुताई सपकाळ यांच्या अनाथ मुलांना दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम आमदार, शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर आणि शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

या प्रसंगी सचिन आहेर यांची बेस्ट संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक करताना डॉ. दिलीप मुरकुटे पाटील म्हणाले, “दिवाळीचा सण आपण सर्वजण उत्साहात साजरा करतो. परिसरातील नागरिकांची दिवाळी अधिक गोड आणि आनंदी व्हावी म्हणून हा सरंजाम वाटप उपक्रम आम्ही राबवितो. नागरिकांचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी पाठीशी असल्याने समाजसेवेचे असे उपक्रम सातत्याने करत राहतो. बाणेर गावातील मंदिरासाठी निधी देण्याबरोबरच बाणेरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारले जाणार असल्यास, त्यासाठीही शिवसैनिक म्हणून मी मोठा निधी देण्याचा संकल्प करतो.”

यावेळी बोलताना शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, “मानवतेचा संवेदनशील धर्म डॉ. दिलीप मुरकुटे यांच्या कार्यातून दिसून येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी ते पुढाकार घेत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. दिलीप भाऊंचा सरंजाम नागरिकांची दिवाळी अधिक गोड करणारा आहे.”

पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सचिन अहिर म्हणाले, “दिलीप भाऊ मुरकुटे हे फक्त दिवाळीपुरतेच नव्हे, तर वर्षभर समाजोपयोगी कार्य करणारे नेतृत्व आहे. जात-धर्माच्या पलीकडे जाऊन सामाजिक चळवळीत सक्रिय राहून ते कार्य करतात. समाजासाठी काहीतरी करण्याची जाणीव ठेवून दीपोत्सवासारख्या कार्यक्रमातून त्यांनी एक नवा आदर्श निर्माण केला आहे. पक्षनिष्ठ शिवसैनिक म्हणून सामाजिक दृष्टिकोनातून काम कसे करावे, याचे उत्तम उदाहरण त्यांनी दाखवून दिले आहे.”

या कार्यक्रमास समाजसेविका ममताताई सिंधुताई सपकाळ, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे, शिवसेना पुणे शहर प्रमुख गजानन थरकुडे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, माजी नगरसेवक तानाजी निम्हण, अॅड. पांडुरंग थोरवे, जयेश मुरकुटे, गुलाबराव तापकीर, संजय निम्हण, महेश सुतार, ह.भ.प. पांडुरंग दातार, राजेश विधाते, ह.भ.प. मारुती कोकाटे, संतोष तोंडे, लक्ष्मण सायकर, बबनराव चाकणकर, ह.भ.प. नामदेव भेगडे, अॅड. माणिक रायकर, संतोष तापकीर, मा. सरपंच नामदेव गोलांडे, अॅड. दिलीप शेलार, प्रवीण डोंगरे, धनंजय भोते, सोमनाथ कोळेकर, नितीन शिंदे, रखमाजी पाडाळे, किरण मुरकुटे, ओम बांगर, श्याम बालवडकर, जंगल रणवरे, जीवन चाकणकर, अर्जुन शिंदे, अर्जुन ननवरे, मधुकर निम्हण, हिरामण तापकीर, अशोक दळवी, ह.भ.प. गणेश मुरकुटे पाटील, सुभाष मटकर, सामाजिक कार्यकर्त्या युगंधरा मुरकुटे, ज्योती चांदेरे, संजय ताम्हाणे, अॅड. विशाल पवार, जीवन खेडेकर, अविनाश गायकवाड तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.