बालेवाडी :
बालेवाडी परिसरातील विविध सोसायट्यांमधील नागरी समस्या नागरिकांच्या सहकार्याने आणि पुणे महानगरपालिकेचे मा. स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली टप्प्याटप्प्याने मार्गी लावल्या जात आहेत. या उपक्रमामुळे कामाचा वेग वाढला असून नागरी प्रश्नांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला देखील गती मिळाली आहे.
या पार्श्वभूमीवर बालेवाडीतील राॅयल पार्क सोसायटी, राईज ॲव्हेन्यू, परफेक्ट १०, परितोष ब्लू, ब्लेस सोसायटी, मानस हेरिटेज, ऐश्वर्या स्मितल रेसीडेन्सी आणि प्रकाश गड या सोसायट्यांमधील नागरिकांसोबत विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मा. स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुल दादा बालवडकर, तसेच युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष समीर चांदेरे उपस्थित होते.
बैठकीत विविध सोसायट्यांमधील रहिवाशांनी रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्थापन आणि इतर पायाभूत सुविधांशी संबंधित अडचणींचे सविस्तर वर्णन केले. यावर सखोल चर्चा करत, संबंधित विभागांशी समन्वय साधून आणि शासनाच्या पातळीवर आवश्यक पाठपुरावा करून या सर्व समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन मा. बाबुराव चांदेरे यांनी नागरिकांना दिले.
बालेवाडी आणि बाणेर परिसरातील रस्ते, वाहतूक तसेच इतर नागरी सुविधांमध्ये मागील काही महिन्यांत राष्ट्रवादी काँग्रेस मुळे सुधारणा झाली सोसायट्यांमधील नागरिकांनी याचे कौतुक व्यक्त केले. आगामी काळात बालेवाडी परिसर ‘सुयोग्य नागरी व्यवस्थेचा आदर्श’ ठरावा यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहनही करण्यात आले.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी