औंध-बोपोडी :
दिवाळीचा खरा आनंद आपल्या हातांनी काहीतरी सुंदर निर्माण करण्यात आहे. त्याच उत्साहाला नवी दिशा देण्यासाठी औंध-बोपोडी परिसरात मोफत आकाशकंदील कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमाचा उद्देश चिमुकल्यांना पारंपरिक सणांचा अनुभव देत त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे हा आहे.
ही कार्यशाळा रविवार, १२ ऑक्टोबर २०२५ रोजी दोन ठिकाणी होणार आहे.
पहिली कार्यशाळा कै. इंदिरा गांधी प्राथमिक विद्यालय, औंध येथे सकाळी १०.०० वाजता, तर दुसरी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, बोपोडी येथे सायंकाळी ४.०० वाजता पार पडेल.
कार्यशाळेदरम्यान सहभागी मुलांना आकाशकंदील बनविण्याचे सर्व साहित्य आयोजकांकडून मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे मुलांना कोणतेही अतिरिक्त साहित्य आणण्याची गरज नाही.
या उपक्रमाबाबत माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी सांगितले की, “दिवाळी हा सण फक्त दिव्यांचा नसून तो सर्जनशीलतेचा, आनंदाचा आणि कुटुंबाच्या एकत्र येण्याचा सण आहे. चिमुकल्यांच्या हातांनी बनवलेले आकाशकंदीलच खऱ्या अर्थाने घर उजळवतात.”
कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी अधिक माहितीसाठी www.sunnynimhan.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.


More Stories
पेरीविंकल पौड शाखेत जागतिक योगा दिन उत्साहात साजरा झाला.
*बावधन शाखेतील पेरीविंकल विद्यालयात योग आणि संगीताचा अनोखा संगम!!!* *झुंबाच्या तालावर विद्यार्थ्यांनी गिरवले योगसाधनेचे संगीतमय धडे!!!*
*बावधन च्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सोनक टोयोटाच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण जनजागृती व वृक्षारोपण अभियान उत्साहात संपन्न!!!*