February 4, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

प्रभाग क्रमांक ९ दिवाळी सरंजाम वाटप, ज्योती कळमकर यांच्या उपक्रमाचे चंद्रकांत दादांनी केले कौतुक — नागरिकांच्या सहभागाने कार्यक्रम उत्साहात संपन्न..

महाळुंगे-बालेवाडी :

श्रीनाथ सोशल फाउंडेशन आणि सौ. ज्योतीताई गणेश कळमकर यांच्या वतीने आयोजित “दिवाळी सरंजाम वाटप” कार्यक्रम महाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाचा शुभारंभ राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते झाला. या प्रसंगी भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे आणि भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या उपक्रमाचे आयोजन भाजपा नेते गणेश कळमकर आणि माजी नगरसेविका सौ. ज्योती गणेश कळमकर यांनी केले होते. बाणेर, बालेवाडी, सुस, महाळुंगे, पाषाण आणि सुतारवाडी-सोमेश्वरवाडी परिसरातील नागरिकांच्या विविध नागरी समस्यांचे निराकरण सतत करत असताना, नागरिकांची दिवाळी गोड आणि आनंदी व्हावी या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करताना सांगितले की, “ज्योतीताई आणि गणेश कळमकर यांनी समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आनंद पोहोचविण्याचे कार्य केले आहे. लोकांच्या समस्या सोडवून, त्यांना सणांचा आनंद देणे हा लोकसेवेचा सर्वोत्तम मार्ग आहे.”

या कार्यक्रमात परिसरातील नागरिकांना दिवाळी साजरी करण्यासाठी आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. नागरिक, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.

यावेळी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, उत्तर मंडल अध्यक्ष श्री. लहू बालवडकर, माजी नगरसेवक श्री. अमोल बालवडकर, सुशील मेंगडे, सचिन पाषाणकर, शांताराम पाडाळे, नामदेवराव गोलांडे, काळुराम गायकवाड, गणपत शेठ बालवडकर, राहुल कोकाटे, चंद्रकांत कोळेकर, भानुदास पाडाळे, सुहास भोते, वैदही बापट, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, प्रवीण शिंदे, संदीप नाना कळमकर, संदीप वाडकर, नितीन सायकर, महादेव सायकर, संजय भुजबळ, सागर ताम्हाणे, सचिन दळवी, मोरेश्वर बालवडकर, प्राजक्ता देवस्थळी, प्रशांत पारखे, शंकर ताम्हाणे, आप्पा भूमकर, दिपक शिंदे, सचिन चाकणकर, राजूशेठ मुरकुटे, राजेश विधाते, निकिता माताडे, अनिकेत चांदेरे, सुरेश सायकर, लक्ष्मण सायकर, बबनराव चाकणकर, स्नेहल चौगुले, उज्वला साबळे, मोसमी बोकारे, रीना रायकर, अर्चना पांडे, शिल्पा कुमकर, पल्लवी पाटील, नीलिमा बुलाखे, विजया चांदोरकर, प्राजक्ता देवस्थळी, मीना पारगावकर, मृणालिनी दुबळे, प्रियंका राठोड, रेखा कश्यप, मृणाल गायकवाड, स्मृती जैन, सुमन रेडवाल, वैशाली कमजदार, दीपा पाटील, कल्याणी टोकेकर आदी मान्यवर उपस्थित होते आणि कोथरूड उत्तर मंडल चे भाजपा सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.