बाणेर :
बाणेर येथील वाडकर (बिटवाईज) चौक परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून सांडपाणी ओव्हरफ्लो होऊन नागरिकांना त्रास होत होता. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत असून लवकरच येथे नव्या ड्रेनेज लाईनच्या कामास सुरुवात होणार आहे.
पुणे महानगरपालिकेने या ठिकाणी ६०० मिमी व्यासाची आणि ११० मीटर लांबीची नविन ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी २५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. संबंधित कामासाठी मनपाने निविदा प्रक्रिया पूर्ण केली असून प्रत्यक्ष अंमलबजावणी लवकरच होणार आहे.
या ठिकाणी आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) चे अधिकारी श्री. कुलकर्णी साहेब यांनी पाहणी केली. यावेळी माजी नगरसेवक अमोलभैय्या बालवडकर यांनी NHAI चे वरिष्ठ अधिकारी श्री. कदम साहेब यांच्याशी संपर्क साधून सर्व्हिस रोडखाली ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी आवश्यक NOC तातडीने देण्याची विनंती केली. त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुढील दोन दिवसांत लेखी मान्यता (NOC) देण्याचे आश्वासन दिले.
लवकरच या कामास प्रारंभ झाल्यानंतर नागरिकांना सांडपाणी ओसंडून वाहण्याच्या समस्येतून आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या आरोग्यधोक्यांपासून निश्चितच मुक्तता मिळणार आहे.
या पाहणीवेळी माजी नगरसेवक अमोलभैय्या बालवडकर यांच्यासमवेत मलनिसारण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. अलभर साहेब, NHAI चे श्री. कुलकर्णी साहेब तसेच कनिष्ठ अभियंता श्री. अनिकेत शिंदे साहेब उपस्थित होते.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!