बालेवाडी :
दिवाळीनिमित्त बालेवाडी येथील राजाभाऊ गुडदे उपक्रम श्री मनशांती छात्रालय फाउंडेशनतर्फे बालदीपोत्सव- शिरूर येथे राबविण्यात आला. संस्थेतील 120 अनाथ निराधार मुलांसाठी रांगोळी, तेल, वाती, दिवे तसेच मुलांना दिवाळी फराळ, मुलांना ट्रक पँट भेट म्हणून देण्यात आले. कार्यालयीन कामासाठी लॅपटॉप देण्यात आला. इमारती च्या बांधकामा साठी काही रक्कम मदत म्हणून देण्यात आली.
यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्षा किरण गुडदे, मनोज माने व संगीत गुडदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. विनय सपकाळ यांनी छात्रालयाविषयी उपस्थितांना माहिती सांगितली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शैलेश अपोतीकर, तेजश्री माने, धंनजय गवारे, थिव्या, अनिमेश गुडदे ,अमित शहा, राहुल बाकडे सचिन राऊत, सौरभ राक्षे, तारक , अमोल व्यवहारे, विष्णु कुटे, असित दास, विनोद भुजाडे, इशान रस्तोगी यांनी विशेष परिश्रम घेतले. सामाजिक बांधिलकी जपन हा उपक्रम राबविल्याचे फाउंडेशच्या अध्यक्षा किरण गुडदे सांगितले.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!