औंध :
औंध गावातील हजरत सय्यद लालशावली दर्गा ट्रस्ट कमिटीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही उर्से शरीफ मोठ्या श्रद्धा व उत्साहात साजरा करण्यात आला. या धार्मिक सोहळ्याचे आयोजन दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष श्रावणकुमार लालसिंह राजपूत व मनिष राजपूत यांनी केले.
उर्सेच्या निमित्ताने औंध गावातून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. डोल ताशांच्या गजरात आणि नारा-ए-तकबीरच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. मिरवणुकीनंतर सर्व भाविकांसाठी आम लंगर (सामुदायिक जेवण) ठेवण्यात आले, ज्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. संध्याकाळी झालेल्या कव्वाली कार्यक्रमाने धार्मिक वातावरण अधिकच रंगतदार बनले.
या उर्से कार्यक्रमाला आमदार बापू पठारे, मा. आमदार वैराटजी, उपमहापौर वाडेकर, औंध गावचे विश्वस्त, मा. बाबू वागस्कर, सनी निम्हण, सौरभ कुंडलिक, दत्ता गायकवाड, वसंत जुनवणे, निलेश जुनवणे, कैलास गायकवाड, हर्षद हांडे, सिराज शेख तसेच औंध गावातील अनेक मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धर्म, एकता आणि बंधुत्व यांचे प्रतीक असलेला हा उर्से शरीफ सोहळा सर्वांच्या उपस्थितीने यशस्वीपणे पार पडला. आयोजकांनी कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!