बाणेर :
बाणेर परिसरातील कृष्णकमल, गगनध्वज, लाजमोह, कीर्ती अव्हेन्यू आदी विविध सोसायट्यांची संयुक्त बैठक आज माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीदरम्यान निम्हण यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत परिसरातील विविध समस्या, अडचणी आणि स्थानिक गरजांबाबत सविस्तर चर्चा केली.
प्रत्येक प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्यासाठी आणि आवश्यक त्या कार्यवाहीसाठी प्रशासनिक स्तरावर योग्य दिशानिर्देश देण्यात आले. नागरिकांच्या सहकार्याने परिसराचा विकास अधिक वेगाने आणि प्रभावीपणे करण्याचा निर्धार या बैठकीत सर्वांनी व्यक्त केला.
यानंतर निम्हण यांनी वाघजाई नगर, महाळुंगे येथील गुलमोहर हौसिंग सोसायटीला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी रहिवाशांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या दैनंदिन अडचणी, स्थानिक प्रश्न आणि विकासाच्या गरजा जाणून घेतल्या.
नागरिकांच्या मागण्यांवर योग्य तोडगा निघावा यासाठी आवश्यक पातळीवर पाठपुरावा करण्याबाबत निम्हण यांनी आश्वासन दिले. सामाजिक सलोखा राखत विकासाच्या दिशेने सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याचा निर्धारही यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.


More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!