बाणेर :
बाणेर येथील बाटा शोरूमच्या मागील लेनमध्ये नागरिकांकडून अनधिकृत वाहन पार्किंगबाबत नागरिकांनी माझ्याकडे तक्रार केली होती. या ठिकाणी कोणीही येऊन गाड्या उभ्या करत असल्यामुळे स्थानिक रहिवाशांना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत होत्या. विशेषतः रिविरेसा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, मातोश्री दगडाबाई रणवरे स्मृती सदन, गंगाई बिल्डिंग, पेनिन्सुला को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, अझालिया को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी तसेच रेन्यू इलेक्ट्रॉनिक्स कंपनी परिसरातील नागरिकांनी या समस्येबाबत सातत्याने तक्रारी केल्या होत्या.
नागरिकांच्या या तक्रारीला त्वरित प्रतिसाद देत आज माझ्यासह ट्रॅफिक विभागाचे एपीआय श्री. डोंगरे सर यांनी सदर ठिकाणी भेट देत पाहणी केली. पाहणीदरम्यान परिसरातील नागरिकांशी संवाद साधून समस्येची सविस्तर माहिती घेतली. या ठिकाणी अनधिकृत पार्किंगमुळे रस्त्यावरील वाहतुकीत अडथळा निर्माण होतो तसेच रहिवाशांना त्यांच्या सोसायट्यांमध्ये ये-जा करताना अडचणींना सामोरे जावे लागते, हे स्पष्टपणे जाणवले.
ट्रॅफिक विभागाशी समन्वय साधून येथील पार्किंगसंबंधी योग्य ती उपाययोजना तातडीने करण्यात येणार असून नागरिकांना सुसज्ज, सुरक्षित व स्वच्छ परिसर मिळावा यासाठी पुढील कार्यवाही सुरू करण्यात येईल.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!