बाणेर :
भोर-राजगड-मुळशीचे लोकप्रिय आमदार मा. श्री. शंकर भाऊ मांडेकर यांच्या मार्गदर्शनानुसार आज राधा चौक येथे सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर सविस्तर पाहणी करण्यात आली.
या पाहणीदरम्यान पोलिस अधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी महिला काँग्रेस पुणे शहराच्या कार्याध्यक्ष सौ. पूनम विशाल विधाते यांनी वाहतूक कोंडीची कारणे, नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी तसेच उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा केली.
राधा चौक परिसरातील वाढती वाहतूक, रस्त्यावरील पार्किंग, सिग्नलची वेळ, तसेच पादचारी आणि दुचाकीस्वारांना होणाऱ्या अडचणी यावर लक्ष केंद्रीत करून प्रशासनाशी समन्वय साधत वाहतूक शिस्त सुधारण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना पूनम विधाते यांनी दिल्या.
पूनम विधाते यांनी सांगितले की, “जनतेच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी वाहतूक व्यवस्थेतील शिस्त अत्यावश्यक आहे. नागरिकांना सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाचा अनुभव मिळावा, हा माझा प्रयत्न आहे.”
या पाहणीला स्थानिक पोलीस अधिकारी, वाहतूक विभागाचे प्रतिनिधी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!