बालेवाडी :
बालेवाडी परिसरातील राॅयल पार्क, राईज ॲव्हेन्यू, परफेक्ट १०, परितोष ब्लू, ब्लेस सोसायटी, मानस हेरिटेज, ऐश्वर्या स्मितल रेसीडेन्सी आणि प्रकाश गड या सोसायट्यांमधील नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीनुसार रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम आजपासून सुरु करण्यात आले आहे.
शनिवारी, ११ ऑक्टोबर रोजी पुणे महानगरपालिकेचे मा. स्थायी समिती अध्यक्ष बाबुरावजी चांदेरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुल दादा बालवडकर आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीदरम्यान नागरिकांनी विविध नागरी समस्यांबाबत मांडणी केली होती. रस्त्यांची दुरवस्था, वाहतुकीतील अडथळे आणि पावसाळ्यानंतर निर्माण झालेली धोकादायक परिस्थिती या प्रमुख तक्रारी नागरिकांनी मांडल्या होत्या.
नागरिकांच्या विनंतीनुसार अवघ्या पाच दिवसांतच रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेऊन प्रत्यक्ष सुरू करण्यात आले आहे. या कामामुळे परिसरातील नागरिकांना आता विना अडथळा आणि सुरक्षित प्रवास करणे शक्य होणार आहे.
या उपक्रमाबाबत बोलताना राहुल दादा बालवडकर यांनी सांगितले की, “प्रत्येक नागरिकाला दर्जेदार नागरी सुविधा देणे ही आमची जबाबदारी आहे. बाबुरावजी चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बालेवाडी परिसरातील विकासकामे जलदगतीने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत.”
रस्त्यांच्या डांबरीकरणामुळे नागरिकांना दीर्घकाळ भेडसावणाऱ्या समस्यांपासून दिलासा मिळणार असून परिसरात वाहतुकीचा प्रवाह अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!