बाणेर :
बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे, पाषाण, सुतारवाडी आणि सोमेश्वरवाडी या परिसरातील शिक्षक व ज्येष्ठ नागरिकांसाठी आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन आणि जागतिक शिक्षक दिनाचे औचित्य साधत भव्य स्नेहमेळाव्याचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक ९ च्या वतीने करण्यात आले. या स्नेहमेळाव्यात समाजाचे मार्गदर्शक असणाऱ्या शिक्षकांचा तसेच आयुष्यभर समाजसेवेसाठी समर्पित राहिलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून त्यांना कृतज्ञतेचा मानाचा मुजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला पुणे महानगरपालिकेचे मा. स्थायी समिती अध्यक्ष बाबुरावजी चांदेरे, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल दादा बालवडकर, गुलाबराव (मामा) तापकीर, माजी सरपंच अंकुश मामा बालवडकर, अर्जुन मामा मुरकुटे, भगवान अप्पा कळमकर, देशपांडे सर, बर्गे सर, आणि अर्जुन अण्णा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात शिक्षक वृंद आणि ज्येष्ठ नागरिकांना सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. समाज घडवणारे शिक्षक आणि त्याला दिशा देणारे ज्येष्ठ नागरिक हे आपल्या समाजाचे खरे आधारस्तंभ असल्याचे या प्रसंगी वक्त्यांनी नमूद केले.
या उपक्रमाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे म्हणाले, “समाज घडवणारे शिक्षक आणि जीवनाला दिशा देणारे ज्येष्ठ नागरिक यांच्या योगदानाचे मोल अमूल्य आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा आणि त्यांच्या आशीर्वादाचे मोल जपण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. सर्व सन्मानित शिक्षक आणि ज्येष्ठ नागरिकांना मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा.”
संपूर्ण कार्यक्रम आनंददायी, स्नेहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी