बालेवाडी :
मराठवाडा परिसरातील पुरग्रस्त भाग (जिल्हा:धाराशीव) भूम परांडा तालुक्यात वंसुधरा अभियान यांच्या मदतीने धान्य किट देण्यात आले. या किटमध्ये तांदूळ, डाळ, तेल, मसाले, साखर, चहापती, बिस्किटे इत्यादी रोजच्या गरजेच्या वस्तूंचा समावेश होता.
या उपक्रमासाठी स्वप्नील धसाळ, सारंग चव्हाण, अक्षय मालुसरे, जयश्री दाते, मनोज माने, मनोज जोशी, संगीत गुडदे,धनंजय गवारे, स्वप्नील जैन, मुकेश शहाकर, अनिमेष गुडदे, शैलेश अपोतीकर, रामचंद्रन वेणुगोपाल यांचे सहकार्य लाभले.
या उपक्रमाद्वारे पूरग्रस्त कुटुंबांना थोडा दिलासा मिळावा आणि त्यांच्या अडचणींमध्ये मदतीचा हात मिळावा, हा राजाभाऊ गुडदे फाउंडेशनचा उद्देश असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा किरण संगीत गुडदे यांनी सांगितले.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!