बाणेर :
बाणेर येथील कल्पतरू सोसायटीमध्ये आज विविध नागरी समस्यांबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस पुणे महानगरपालिकेचे मा. स्थायी समिती अध्यक्ष मा. बाबुरावजी चांदरे साहेब हे प्रमुख उपस्थित होते. यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुलदादा बालवडकर, पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष समीर चांदेरे तसेच तुकाराम तात्या कळमकर हेही उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान सोसायटीतील रहिवाशांनी विविध मूलभूत समस्या मांडत, त्या समस्यांवर उपाययोजना आणि पुढील नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. रहिवाशांनी मांडलेल्या प्रत्येक मुद्द्यावर गांभीर्याने विचार करून प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा करून योग्य तो तोडगा काढण्याचं आश्वासन या वेळी देण्यात आलं.
तसेच, बैठकीदरम्यान तुकाई माता मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या तुकाई टेकडीवरील रस्त्याचे काम आणि ननावरे चौकातील रस्त्याचे काम पूर्ण केल्याबद्दल सोसायटीमधील रहिवाशांनी विशेष कौतुक व्यक्त केले. या कौतुकाबद्दल मा. बाबुरावजी चांदरे साहेब यांनी रहिवाशांचे आभार मानले आणि नागरिकांच्या सहकार्याने परिसरातील विकासकामे अधिक गतीमान करण्याचा निर्धार व्यक्त केला.
ही बैठक सकारात्मक आणि फलदायी वातावरणात पार पडली असून, येत्या काळात बाणेर परिसरातील नागरी समस्यांवर प्रभावी उपाययोजना राबविण्यात येतील, असा विश्वास यावेळी माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी व्यक्त केला.





























More Stories
*‘विनायकी’ विनायक निम्हण शिष्यवृत्ती म्हणजे समाज घडवणारी योजना : पद्मविभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार*
लोकशाही संस्कारांचा अनोखा उपक्रम; विद्यापीठ हायस्कूलमध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात
कोथरूड विधानसभा मधील पाषाण-सुतारवाडी लिंक रोड वरील कचऱ्यावरून राजकारण पेटले! अमोल बालवडकरांच्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे; पण तत्परता फक्त ‘खास’ भागापुरतीच का?