बालेवाडी :
अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या “मिशन निर्मल” या स्वच्छता अभियानाच्या तेराव्या व चौदाव्या दिवसाचे उपक्रम बालेवाडी परिसरात अत्यंत उत्साहात पार पडले. या उपक्रमामुळे बालेवाडी परिसर स्वच्छ व निर्मळ दिसू लागला आहे.
📍 तेरावा दिवस:
एफ रेसिडेन्सी, बालेवाडी गावठाण, दसरा चौक, पर्ल सोसायटी ते कुणाल एस्पायरी या परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. स्थानिक नागरिक, स्वयंसेवक व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन संपूर्ण परिसराची स्वच्छता केली. “आपला परिसर, स्वच्छ परिसर” या भावनेतून घेतलेल्या सहभागामुळे परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि निरोगी झाला.
📍 चौदावा दिवस:
साई चौक ते गोल्डन ट्रेलिज, पलाझो, सफायर पार्क, मधुबन, मधुकोश, निर्मिती झीओन, परफेक्ट 10, गिनी विविआना, साई कॅनरी, कॉन्कर्ड पोर्शिया आणि लेबरनम सोसायटी या परिसरांत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या दरम्यान नागरिकांना स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून देत जनजागृती करण्यात आली.
नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत पुढेही आपला परिसर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही सातत्यपूर्ण मोहिम चालवली जात असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेची जाणीव आणि जबाबदारीची भावना वाढीस लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
“मिशन निर्मल” उपक्रमातून बालेवाडी परिसर स्वच्छतेच्या दिशेने वाटचाल करत असून, नागरिक आणि फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे “स्वच्छ बालेवाडी, सुंदर बालेवाडी” हा संकल्प साकार होत आहे.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!