बालेवाडी :
बालेवाडी परिसरातील दीर्घकाळ प्रलंबित रस्त्यांच्या समस्येवर शेवटी तोडगा निघाला असून, नागरिकांना सुरक्षित व सुकर प्रवासाचा दिलासा मिळाला आहे.
साई कॅनरी, ऋग्वेद अपटाऊन, संयोग, कॉनकॉर्ड पोर्टिया या सोसायट्यांतील रहिवाशांसोबत पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल दादा बालवडकर आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या उपस्थितीत फलदायी बैठक पार पडली. या बैठकीत नागरिकांनी अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्यांच्या समस्येबाबत मनमोकळेपणाने मांडणी केली.
जनतेच्या आवाजाची गांभीर्याने दखल घेत पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष मा. बाबुराव चांदेरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने कार्यवाही करण्यात आली आणि रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करण्यात आले.
बालेवाडीतील शंकर पार्वती पार्क लेन परिसरातील कॉनकॉर्ड पोर्टिया, वंडरवाल, अनीशा व स्वप्नमूर्ती या सोसायट्यांच्या परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे. अनेक दिवसांपासून खड्डेमय अवस्थेत असलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना पावसाळ्यात मोठा त्रास सहन करावा लागत होता. स्थानिकांच्या तक्रारीची तातडीने दखल घेत ही कामे पूर्ण करण्यात आली.
या कामांमुळे— ✅ नागरिकांना सुरक्षित व सुकर प्रवासाची सुविधा मिळाली
✅ वाहतुकीतील अडथळे आणि धोक्यांना पूर्णविराम मिळाला
✅ परिसराचे सौंदर्य अधिक खुलले आणि नवी ऊर्जा निर्माण झाली
स्थानिक रहिवाशांनी या उपक्रमाचे स्वागत करत “आता प्रवास सुखकर झाला” अशी प्रतिक्रिया दिली असून, त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले आहे.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!