बाणेर :
बाणेरचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे भूमिपूजन श्री राम जन्मभूमी अयोध्या मधील श्री राम मंदिराचे कोषाध्यक्ष श्री गोविंददेवजी गिरी महाराज ( स्वामीजी )यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, भोर-वेल्हा-मुळशीचे आमदार शंकरभाऊ मांडेकर, बाणेर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर सावंत साहेब ,माजी नगरसेवक अमोलभैया बालवडकर व माजी नगरसेविका ज्योतीताई कळमकर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन समस्त बाणेर ग्रामस्थ व श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट तर्फे करण्यात आले होते. यामध्ये ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री राहुलजी पारखे, सचिव श्री अनिकेतजी मुरकुटे, खजिनदार वर्षाताई राजेश विधाते, तसेच श्री प्रवीणजी विलास शिंदे व श्री मंगेशजी पुंडलिक मुरकुटे यांनी बाणेर ग्रामस्थांच्या सहकार्याने या सोहळ्याचे यशस्वी आयोजन केले होते.
अनेक वर्षे रखडलेला मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी उत्स्फूर्त पणे अनेक ग्रामस्थांनी लाखो रुपयांची देणगी जाहिर केली. श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व बाणेर ग्रामस्थ यांच्या सहकार्याने मंदिराचा जीर्णोध्दार सिद्धीस जाणार आहे. या सोहळ्याला बाणेरमधील ज्येष्ठ नागरिक युवक व महिलांनी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहून ग्रामदैवताविषयी असलेले श्रद्धाभाव प्रकट केले.


More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!