February 5, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडीत ज्योतीताई व राहुल दादा बालवडकर यांच्या संकल्पनेतून अविस्मरणीय दांडिया सोहळा सुरू…

बालेवाडी :

पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे ज्योतीताई राहुल बालवडकर आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष राहुल दादा बालवडकर यांच्या संकल्पनेतून बालेवाडी येथील दसरा चौकात भव्य इनडोअर नवरात्री दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले. पारंपरिक व आधुनिकतेचा संगम घडवणारा हा सोहळा खऱ्या अर्थाने सांस्कृतिक उत्सव ठरला. आज आणि उद्या दोन दिवस हा सोहळा चालू राहणार आहे. आज सिने अभिनेत्री अश्विनी महागडे यांची उपस्थिती असणार आहे.

या प्रसंगी पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे,माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर कार्याध्यक्ष मनोज बालवडकर, टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष चेतन बालवडकर, हर्षल तापकीर, अक्षता बालवडकर, सायली शिंदे, कोमल तांबे, स्वाती बालवडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री अभिज्ञा भावे या विशेष अतिथी म्हणून सहभागी झाल्या. नवरात्रीच्या पावन पर्वात देवीच्या उपासनेसह आनंद, एकोपा आणि संस्कृतीचा उत्सव साजरा करताना उपस्थितांना एक वेगळा अनुभव मिळाला.

या दांडिया उत्सवाच्या माध्यमातून स्त्रीशक्तीचा अनोखा आविष्कार आणि उत्साहपूर्ण वातावरण अनुभवायला मिळाले. बालेवाडीकरांसाठी हा सांस्कृतिक सोहळा अविस्मरणीय ठरला.या दांडिया सोहळ्यात प्रत्येक दिवशी विजेत्याना चांदीचा दांडिया बक्षीस देण्यात येणार आहे.