बालेवाडी :
नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे हीच खरी जनसेवा आहे, या ध्येयाने प्रेरित होत बालेवाडीतील मातोबा नगर व यशोदा चौक परिसरात मच्छरांची वाढती उत्पत्ती लक्षात घेऊन मच्छरनाशक फवारणी करण्यात आली. डेंग्यू, मलेरिया यांसारख्या संसर्गजन्य आजारांपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी हा उपक्रम माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल बालवडकर यांच्या वतीने राबविण्यात आला.
या उपक्रमाद्वारे परिसरात साचलेले पाणी, घाण व मच्छरांच्या उत्पत्तीचे ठिकाणे ओळखून त्यावर फवारणी करण्यात आली. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत आरोग्य विषयक जबाबदारीची जाणीव दाखविल्याबद्दल बालवडकर यांचे आभार मानले.
“आपल्या परिसरात स्वच्छता, आरोग्य व सुरक्षितता याकडे प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारीने लक्ष देत राहू. नागरिकांचे आरोग्य हेच आमचे प्राधान्य आहे,” असे राहुल दादा बालवडकर यांनी यावेळी सांगितले.





























More Stories
बाणेर जलतरण तलावात दीड लाखाचे युनिट साडेनऊ लाखांना? कोथरूडमधील जलतरण तलावांच्या कामात ३८ लाखांच्या खर्चावरून अमोल बालवडकर यांची चौकशीची मागणी
कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांचा निधी रद्द; राजकीय वैमनस्यातून जनतेच्या कामात खोडा : अमोल बालवडकर
*म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा*