म्हाळुंगे :
नवरात्रौत्सवानिमित्त म्हाळुंगे येथील व्हिटीपी बेलएअर सोसायटीमध्ये खास महिलांसाठी ‘होम मिनीस्टर – खेळ पैठणीचा’ या आगळ्या-वेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महिलांमधील कार्यकुशलता, आत्मविश्वास आणि सर्जनशीलता वृद्धिंगत व्हावी या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. सरला आक्का बाबुराव चांदेरे उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते विजेत्या महिला भगिनींना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला सोसायटीतील महिला सदस्य तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महिलांच्या सहभागातून नवरात्रोत्सव अधिक अर्थपूर्ण झाला असून, समाजातील महिलांना प्रोत्साहन देणाऱ्या अशा उपक्रमांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. व्हिटीपी बेलएअर सोसायटीतर्फे अशा सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन नियमितपणे होत असल्याचे आयोजकांनी सांगितले.





























More Stories
बाणेर जलतरण तलावात दीड लाखाचे युनिट साडेनऊ लाखांना? कोथरूडमधील जलतरण तलावांच्या कामात ३८ लाखांच्या खर्चावरून अमोल बालवडकर यांची चौकशीची मागणी
कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांचा निधी रद्द; राजकीय वैमनस्यातून जनतेच्या कामात खोडा : अमोल बालवडकर
*म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा*