सुस :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या सूस शाखेत आज शनिवार, दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी दांडिया महोत्सव २०२५ चे भव्य आयोजन करण्यात आले होते*. आजचा हा दांडिया महोत्सव विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या सहयोगाने मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवर बावधन पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक तसेच संस्थेच्या संचालिका सौ रेखा बांदल, शिवानी बांदल व निर्मल पंडित यांच्या हस्ते फीत कापून पारंपरिक दिपप्रज्वलन व दांडिया आरतीने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे दर्शन घडवणारा ओपनिंग ग्रुप दांडिया नृत्य रंगला. संगीताची लय आणि नृत्याचा ठेका जुळवत लाईव्ह बँड व DJ च्या तालावर दांडिया सादरीकरण करण्यात आले.
सर्व उपस्थितांसाठी खुला ठेवलेला ओपन दांडिया रास हा कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ठरला. यात विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी उत्साहात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी उभारलेले आकर्षक दांडिया स्टॉल्स देखील कार्यक्रमाची शोभा वाढवणारे ठरले. विविध दांडिया कॉन्टेस्ट्स आणि खास सरप्राईज दांडिया परफॉर्मन्सेस मुळे संपूर्ण वातावरण जल्लोषमय झाले.
🎉 शाळेचे भव्य दिव्य पटांगण हे आकर्षक रोषणाईने तसेच रंगीबेरंगी सजावटीने उजळून निघाले होते. संपूर्ण परिसरात आनंदाची आणि उत्साहाची लहर निर्माण झाली होती. रंगीबेरंगी पोशाखात सजलेले विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यामुळे वातावरण अधिकच रंगमय झाले होते. संपूर्ण सोहळा हा नेत्रदीपक आणि अविस्मरणीय ठरला. 🎉
इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाखांत सजून सहभाग घेतला. कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट वेशभूषा आणि बेस्ट डान्सर यांना पारितोषिके देण्यात आली. दर ३० मिनिटांनी झालेल्या लकी ड्रॉ मुळे कार्यक्रमात अजूनच उत्सुकता वाढली. काही विद्यार्थ्यांनी कल्पकतेतून खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावले होते. वडापाव ,मिसळ, मोमोज ,वॉटर बॉटल ,पाणीपुरी, चाट, गोड पदार्थ आणि विविध स्नॅक्स यांचा सर्वांनी मनमुराद आस्वाद घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची भावना आणि स्वावलंबनाचा धडा शिकण्यास मिळाला.
कार्यक्रमाचा समारोप वोट ऑफ थँक्स आणि फायनल दांडिया डान्स ने करण्यात आला. या प्रसंगी मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
दांडियामागील धार्मिक व सांस्कृतिक महत्त्वही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. दांडिया म्हणजे देवी दुर्गेच्या महिषासुरावरील विजयाचे प्रतीक. दांडियाच्या काठ्या या मातेच्या शस्त्रांचे प्रतीक मानल्या जातात. त्यामुळे हा खेळ केवळ नृत्याचा आनंद देत नाही तर चांगल्या शक्तीच्या विजयाचा संदेश देखील देतो. अशा पारंपरिक उपक्रमांतून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख मिळते आणि सणांचे खरे महत्त्व समजते.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल, शिवानी बांदल, व मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली व नेतृत्वाखाली पर्यवेक्षक श्री. सचिन खोडके, सौ. स्मिता श्रीवास्तव व सौ. नेहा माळवदे यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. हाउस कॅप्टन कृष्णा अंबुरे यांचे अचूक नियोजन तसेच कलाशिक्षक शिवराज कदम व मोरे सर यांच्या अप्रतिम सजावट यासर्वांमुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. सर्व शिक्षक-शिक्षिकांच्या सक्रिय सहभागामुळे विद्यार्थ्यांसाठी हा दांडिया महोत्सव अविस्मरणीय ठरला.
🌸 दांडियाच्या तालांमधून पेरीविंकल च्या विद्यार्थ्यांनी संस्कृतीचा वारसा अनुभवला, एकतेचा संदेश घेतला आणि सर्वांगीण विकासासाठी प्रेरणा मिळवली. 🌸



More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
“शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार घडले तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते” – मा. आमदार शरद ढमाले