बाणेर :
मराठवाडा परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या भीषण संकटात अनेक शेतकरी बांधवांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, घरामध्ये पाणी शिरल्यामुळे शेतमाल व जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आणि पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्या स्वप्नाली प्रल्हाद सायकर यांनी आपला वाढदिवस साजरा न करता, पूरग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी ‘एक हात मदतीचा’ हा सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
या उपक्रमाअंतर्गत स्वप्नाली सायकर आपल्या २८ तारखेला असणाऱ्या वाढदिवसानिमित्त १००० धान्य किट पाठविणार आहेत . यामध्ये जीवनावश्यक वस्तू, धान्य व खाद्यसामग्रीचा समावेश असून, पूरग्रस्त कुटुंबांना थोडासा दिलासा मिळावा, हा त्यामागचा उद्देश आहे.
स्वप्नाली सायकर यांनी नागरिकांना देखील आवाहन केले आहे की, “या मदतीच्या उपक्रमात प्रत्येकाने सहभागी होऊन पूरग्रस्त बांधवांना मदतीचा हात द्यावा. आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा या कार्यातून मला मिळतील.”
पूरग्रस्त शेतकरी बांधवांसाठी केलेला हा सामाजिक उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
🔸 “नको बुकें, नको बुक आता भागवूया गरजूंची भूक”
🔹 एक हात मदतीचा – स्वप्नाली प्रल्हाद सायकर(माजी नगरसेविका, पुणे मनपा | मा. सदस्य – पुणे जिल्हा नियोजन समिती)


More Stories
*औंध-बोपोडी परिसरात पाच ठिकाणी सार्वजनिक वसुबारस पूजनाचे आयोजन, नगरसेवक सनी विनायक निम्हण यांचे नागरिकांना कुटुंबासह सहभागी होण्याचे आवाहन*
बाणेरच्या ‘रेजेन्सी अस्ट्रा’ प्रकल्पाला स्टॉपवर्क! सर्व्हे नं. ५४ मधील रोहन लेहेर लेआउटच्या अॅमेनिटी स्पेस गैरव्यवहार प्रकरणी महापालिकेची कारवाई*
*प्रसिद्ध डायरेक्ट सेलिंग कंपनी ‘प्रोव्हेदा इंडिया’चा ७ वा वर्धापन दिन पुण्यात दणक्यात संपन्न!*