म्हाळुंगे :
सालाबादप्रमाणे या वर्षीही अखिल म्हाळुंगे गाव नवरात्र उत्सव मंडळाचा नवरात्र उत्सव मोठ्या भक्तीभावात व उत्साहात साजरा होत आहे. यंदा मंडळ आपल्या ९ व्या वर्षात पदार्पण करत असून, गेल्या आठ वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक आणि कला-क्रीडा क्षेत्रात कार्यरत आहे.
मंडळाने स्थापनेपासून गावातील महिलाभगिनींसाठी एक व्यासपीठ निर्माण केले असून, याच माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत. या कालावधीत किर्तन, होम मिनिस्टर स्पर्धा, आरोग्य शिबिरे अशा विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे.
नवरात्र उत्सवाच्या काळात कन्यारत्न प्राप्त झालेल्या कुटुंबांचा सन्मान हा मंडळाचा विशेष उपक्रम ठरला आहे. आतापर्यंत १२ भगिनींना पाळणा व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले आहे. यावर्षीही तीन भगिनींना कन्यारत्न प्राप्त झाल्याने त्यांनाही पाळणा प्रदान करण्यात येणार आहे.
तसेच, कन्यापूजन कार्यक्रमांतर्गत ५१ लहान मुलींचे पूजन करून त्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप केले जाते.
नवरात्र काळातील आणखी एक आकर्षण म्हणजे दांडिया स्पर्धा, जी दहा दिवस उत्साहात पार पडते. रोज विजेत्यांना बक्षिसे देण्यात येतात, तर अंतिम दिवशी भव्य स्पर्धेचे आयोजन करून टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, गॅस शेगडी, नथ, पैठणी, सायकल, स्टडी टेबल, शालेय साहित्य अशा आकर्षक बक्षिसांचे वितरण केले जाते.
मंडळाकडून सांगण्यात आले की, अशा सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची परंपरा पुढेही सुरू ठेवण्यात येईल, तसेच गावातील नागरिकांचा उत्सवातील सहभाग वाढविण्यासाठी आणखी नवीन उपक्रम हाती घेतले जातील.





























More Stories
कोथरूड विधानसभा मधील पाषाण-सुतारवाडी लिंक रोड वरील कचऱ्यावरून राजकारण पेटले! अमोल बालवडकरांच्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे; पण तत्परता फक्त ‘खास’ भागापुरतीच का?
सुस परिसर वाहतूक कोंडीबाबत अनिकेत चांदेरे यांच्याकडून वाहतूक पोलिसांना निवेदन
मैत्रीचा धागा, विश्वासाचे नाते! युवा स्पंदनतर्फे चतुःश्रुंगी व कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये फ्रेंडशिप डे उपक्रम