बालेवाडी :
नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर बालेवाडी परिसरात सांस्कृतिक उत्साहाला सुरुवात झाली असून माझी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. ज्योतिताई बालवडकर (राष्ट्रवादी महिला काँग्रेस) यांच्या पुढाकाराने तर श्री. राहुलदादा बालवडकर (उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे शहर) यांच्या वतीने राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीतर्फे भव्य इनडोअर नवरात्री दांडिया उत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा उत्सव २८, २९ व ३० सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत दररोज रंगणार असून नागरिकांसाठी प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे.
या उत्सवात अभिनेत्री क्रांती रेडकर, अमृता भावे व अश्विनी महांगडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमात दररोज लकी ड्रॉद्वारे आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून प्रत्येक दिवशी पाच विजेत्यांना चांदीच्या दांडिया संचाचे बक्षिस मिळणार आहे.
बालवाडी परिसरातील रहिवाशांसाठी हा उत्सव एक सांस्कृतिक पर्व ठरणार असून महिलांसाठी वेगळे आकर्षण व मुलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक वेशभूषा, संगीत आणि नृत्याच्या माध्यमातून नवरात्री साजरी करण्यासाठी नागरिकांना या उत्सवाचे विशेष आमंत्रण देण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण: राहुलदादा बालवडकर जनसंपर्क कार्यालय, दसरा चौक, बालेवाडी, पुणे – ४५.


More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!