पाषाण :
देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राज्याचे उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील तसेच केंद्रीय राज्य मंत्री मा. मुरलीधर (अण्णा) मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल यांच्या वतीने सुरू असलेल्या सेवा पंधरवडा अभियान अंतर्गत “एक पेड माँ के नाम” या संकल्पनेनुसार पाषाण तलाव येथे वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.
यावेळी कोथरूड विधानसभा मित्र मंडळ अध्यक्ष लहू बालवडकर, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, माजी अध्यक्ष सचिन पाषाणकर, सरचिटणीस सचिन दळवी, सरचिटणीस मोरेश्वर बालवडकर, मृणाल गायकवाड, स्मृती जैन, सुभाष भोळ, प्रमोद कांबळे, विवेक मेथा, शकील सलाटी, ओमप्रकाश वानखेडे तसेच कोथरूड विधानसभा उत्तर मंडलातील सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
पर्यावरण संरक्षणाची गरज अधोरेखित करत “एक पेड माँ के नाम” या मोहिमेद्वारे वृक्षारोपणाचा संदेश समाजात पोहोचविण्यात आला. या उपक्रमामुळे परिसरातील हरिताई वाढून पर्यावरण संतुलन राखण्यास हातभार लागणार आहे.



More Stories
“उच्च तंत्र की तंत्रमंत्र? अमोल बालवडकरांचा भोंदू खरात सोबत फोटो वरून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा”
औंध ग्रामदैवत भैरवनाथ महाराज उत्सव ३ मे रोजी; ग्रामसभेत तारीख जाहीर
लहानग्यांच्या स्वप्नांना मिळाले पंख: पेरिविंकल पिरंगुटमध्ये सीनियर केजी ग्रॅज्युएशन डे जल्लोषात साजरा!!!