बावधन :
नव्याने समाविष्ट गाव बावधन बुद्रुक येथे कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालय (घनकचरा व्यवस्थापन विभाग) यांच्या वतीने “स्वच्छता ही सेवा – १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पंधरवडा स्वच्छोत्सव” अभियानांतर्गत स्वच्छता रॅली व जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाचे मार्गदर्शन घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त संदीप कदम, परिमंडळ कार्यालय क्र. ०२ चे उपायुक्त संतोष वारुळे, महापालिका सहाय्यक आयुक्त विजय नायकल यांनी केले. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला.
कै. चेतन दत्ताजी गायकवाड शाळेच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी स्वच्छता रॅलीत उत्साहाने सहभाग घेतला. तसेच जनवाणी संस्था आणि जनसुविधा सोशल फाउंडेशन यांनी पथनाट्याद्वारे सार्वजनिक स्वच्छता, प्लास्टिक बंदी आणि कचरा विलगीकरण याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली.
या वेळी मा. नगरसेवक दिलीप अण्णा वेडे पाटील, बावधन नवरात्र उत्सव समितीचे पदाधिकारी, मा. उपसरपंच बावधन ग्रामपंचायत श्री. तानाजी दगडे, तसेच आरोग्य विभागातील निरीक्षक हनुमंत चाकणकर, लक्ष्मण कुलकर्णी, करण कुंभार, दत्तात्रय दळवी, राजेश आहेर, गणेश चोंधे, प्रमोद चव्हाण, सूरज पवार, मोकादम राम गायकवाड, साईनाथ तेलंगी, बापू वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्थानिक नागरिक बाळनाथ भुंडे, अशोक भुंडे, नथू दगडे, राजेंद्र दगडे, भिवाजी जाधव तसेच सर्व सफाई कर्मचारी, जनवाणी सेवा संस्था, स्वच्छ सहकारी संस्था आणि जनसुविधा सोशल फाउंडेशनचे सदस्यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.



More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
“शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार घडले तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते” – मा. आमदार शरद ढमाले