पाषाण :
पाषाण, सोमेश्वरवाडी आणि सुतारवाडी परिसरातील विविध प्रलंबित विकासकामांच्या मागण्यांबाबत आज माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांनी स्थानिक नागरिकांच्या वतीने आदरणीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना निवेदन सादर केले.
या निवेदनामध्ये रस्त्यांची दुरुस्ती, पाणीपुरवठ्याची सुरळीत व्यवस्था, तसेच सार्वजनिक सुविधांची उभारणी या महत्त्वाच्या मागण्या समाविष्ट करण्यात आल्या. स्थानिक नागरिकांना भेडसावत असलेल्या दैनंदिन अडचणींची माहितीही यावेळी सविस्तरपणे मांडण्यात आली.
निवेदन स्विकारताना अजित दादांनी सर्व मागण्या सकारात्मकपणे ऐकून घेतल्या व संबंधित कामांवर तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!