चिंचवड, दि. २५ सप्टेंबर २०२५ :
इंडियन आयडॉल मराठी फेम गायक सुरेश ज्ञानेश्वर कदम (मूळगाव – खानापूर, भोर) यांना प्रतिष्ठेचा ‘मराठवाडा संगीत रत्न पुरस्कार २०२५’ ने सन्मानित करण्यात आले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्याने रामकृष्ण प्रेक्षागृह, चिंचवड, पुणे येथे गुरुवार, २५ सप्टेंबर रोजी सायं. ४ वाजता झालेल्या विशेष सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पद्मश्री डॉ. तात्या राव लहाने आणि ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस होते.
पुरस्कार स्वीकारताना सुरेश कदम म्हणाले,
“या यशाच्या प्रवासात माझे गुरुवर्य खंडेराव मुळे, गुरुवर्य रघुनाथ खंडाळकर, मार्गदर्शक डॉ. महेश वडदरे तसेच माझे वडील ज्ञानेश्वर कदम यांचे मोलाचे योगदान आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम समितीचे मी मनःपूर्वक आभार मानतो.”
तसेच त्यांनी आपल्या यशामध्ये महत्त्वाची साथ देणाऱ्या मान्यवरांचा विशेष उल्लेख केला. त्यामध्ये आमदार शंकरभाऊ मांडेकर (भोर-राजगड-मुळशी मतदारसंघ), पेरिविंकल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल सर, भोर नगराध्यक्ष रामचंद्र नाना आवारे, मुख्याध्यापक रमेश बुदगुडे सर, नगरसेवक किशोर पोकळे, सुप्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार, जि.प. सदस्य कुलदीप तात्या कोंडे, नगरसेवक धनंजय बोडारे, तसेच संदीप नांगरे, उत्तम थोपटे, राजेश कदम, समीर कदम, दिलीप कदम, एकनाथ कदम आणि अॅडव्होकेट भाग्यश्री मोरे (ग्रामस्थ मंडळ खानापूर) यांचा समावेश आहे.
हा पुरस्कार गायक सुरेश कदम यांच्यासाठी एक मानाचा टप्पा मानला जात असून त्यांच्या पुढील संगीत प्रवासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!