बालेवाडी, ता. 26 सप्टेंबर :
बालेवाडी येथील साई कॅनरी, ऋग्वेद अपटाऊन, संयोग आणि काॅनकोर्ड पोर्टिया या सोसायट्यांतील रहिवाशांतर्फे एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुल दादा बालवडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे उपस्थित होते.
सोसायटीतील रहिवाशांनी विविध नागरी समस्या मांडून त्याविषयी सखोल चर्चा केली. सर्व मुद्दे ऐकून घेतल्यानंतर पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष मा. बाबुरावजी चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली या समस्या तातडीने सोडवण्यात येतील, असे ठोस आश्वासन नागरिकांना देण्यात आले.
या प्रसंगी बालेवाडी-बाणेर-पाषाण रहिवासी संघटनेचे (BBPRA) मुख्य समिती सदस्य अमेय भाऊ जगताप, टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष चेतन दाजी बालवडकर, शशी भाऊ बालवडकर, हर्षल तापकीर तसेच सोसायटीतील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





























More Stories
बाणेर जलतरण तलावात दीड लाखाचे युनिट साडेनऊ लाखांना? कोथरूडमधील जलतरण तलावांच्या कामात ३८ लाखांच्या खर्चावरून अमोल बालवडकर यांची चौकशीची मागणी
कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांचा निधी रद्द; राजकीय वैमनस्यातून जनतेच्या कामात खोडा : अमोल बालवडकर
*म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा*