इंदापूर :
पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने इंदापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या पुणे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या बावधन व पिरंगुटच्या विद्यार्थिनींनी आपली दणकट छाप उमटवली.
🔹 Under-17 Girls (65 kg वजन गट) : अंतरा कंधारे – प्रथम क्रमांक(सुवर्ण पदक)🥇
🔹 Under-14 Girls (53 kg वजन गट) : स्पृहा कालेकर – तृतीय क्रमांक 🥉
🔹 Under-17 Girls (46 kg वजन गट) : हर्षदा बलकवडे – तृतीय क्रमांक 🥉
या स्पर्धेत चुरशी सामन्यात बावधन शाखेच्या अंतराने अप्रतिम खेळ सादर करून प्रथम क्रमांकावर बाजी मारून सुवर्णपदक पटकावले व शाळेची मान अजूनच उंचावली तर पिरंगूट च्या स्पृहा व हर्षदाने शिस्त, ताकद व चिकाटीच्या जोरावर कांस्यपदके मिळवली. या तिन्ही विद्यार्थिनींच्या यशामुळे पेरिविंकल शाळेचे नाव पुन्हा एकदा जिल्हास्तरीय क्रीडा नकाशावर उजळून निघाले.
या यशामागे क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन तसेच शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल, कु. शिवानी बांदल बावधन शाखेच्या प्राचार्या सौ. निर्मल पंडीत पिरंगूट येथील आसावरी हंचाटे यांचे मार्गदर्शन तसेच विभाग प्रमुख सायली गायकवाड, शिरीन काझी, पूनम पांढरे, सौ. सना इनामदार व सौ. पल्लवी नारखेडे यांचे प्रोत्साहन लाभले.





























More Stories
कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांचा निधी रद्द; राजकीय वैमनस्यातून जनतेच्या कामात खोडा : अमोल बालवडकर
*म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा*
*पिरंगुटच्या पेरिविंकलमध्ये व्यसनमुक्तीचा जागर; नागपंचमीच्या औचित्याने विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा!!*