पाषाण :
जय भवानी नवरात्र उत्सव ट्रस्ट पाषाण यांच्या वतीने यंदा भव्य दांडिया उत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. पाषाण येथे पहिल्यांदा माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांच्या वतीने नवरात्रीच्या जल्लोषात सजणाऱ्या या कार्यक्रमात सुरेख संगीताच्या तालावर दांडिया व गरब्याची रंगतदार मेजवानी नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे.
हा दांडिया उत्सव शुक्रवार, दि. २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पाषाण येथील सुतारवाडी रोडवरील जय भवानी नगरमधील वॉटरसप्लायच्या जवळ रंगणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे सर्वोत्कृष्ट पोशाख, सर्वोत्कृष्ट नृत्य, बेस्ट कपल अशा विविध स्पर्धा तसेच आकर्षक बक्षिसांची आतषबाजी असेल.
रंगीबेरंगी पोशाखात सजून आलेल्या सहभागींचा उत्साह, दांडिया आणि गरब्याच्या ठेक्यावर रंगणार आहे. “नवरात्रीचा उत्सव, आपुलकीचा संगम” या घोषवाक्यासह हा कार्यक्रम पार पडणार असून मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिक सहभाग घेणार आहेत.



More Stories
“उच्च तंत्र की तंत्रमंत्र? अमोल बालवडकरांचा भोंदू खरात सोबत फोटो वरून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा”
औंध ग्रामदैवत भैरवनाथ महाराज उत्सव ३ मे रोजी; ग्रामसभेत तारीख जाहीर
लहानग्यांच्या स्वप्नांना मिळाले पंख: पेरिविंकल पिरंगुटमध्ये सीनियर केजी ग्रॅज्युएशन डे जल्लोषात साजरा!!!