बावधन :
बावधन बुद्रुक येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक २ मध्ये बेंटली सिस्टिम्स इंडिया पुणे या फाऊंडेशनतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी वॉटर प्युरीफायर (आरओ प्लांट) भेट म्हणून देण्यात आला. यासाठी मा. ग्रामपंचायत सदस्य युवा नेते सूर्यकांत भुंडे यांनी पुढाकार घेत पाठपुरावा केला त्याला यश मिळाले. या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून त्यांच्या आरोग्याचे रक्षण होण्यास मदत मिळणार आहे.
या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक उध्दव सुतार, ग्रामपंचायत सदस्य व युवा नेते सूर्यकांत भुंडे, फाऊंडेशनचे प्रतिनिधी व अभियंता वैभव शेळके, यश घोरपडे, गणेश डुबे, प्रणाली सोनवणे, लकांबाई पोकळे, रेणुका न्हिवेकर आदी मान्यवर उपस्थित होते. शाळेच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाचे स्वागत केले.
यावेळी बोलताना सूर्यकांत भुंडे म्हणाले, “सध्या जलजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. अशा परिस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी मिळणे अत्यंत आवश्यक आहे. याच हेतूने बेंटली फाऊंडेशनकडे वॉटर प्युरीफायर बसविण्याची मागणी करून सातत्याने पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले असून आज शाळेत हा प्युरीफायर बसवण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राहील.”
या उपक्रमामुळे शाळेतील शेकडो विद्यार्थी व शिक्षकांना शुद्ध पाणी पिण्याची सुविधा उपलब्ध झाली असून पालकवर्गाकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे. बावधन परिसरातील शैक्षणिक संस्थांसाठी हा एक आदर्श उपक्रम ठरला आहे.




























More Stories
बाणेर जलतरण तलावात दीड लाखाचे युनिट साडेनऊ लाखांना? कोथरूडमधील जलतरण तलावांच्या कामात ३८ लाखांच्या खर्चावरून अमोल बालवडकर यांची चौकशीची मागणी
कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांचा निधी रद्द; राजकीय वैमनस्यातून जनतेच्या कामात खोडा : अमोल बालवडकर
*म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा*