बाणेर, दि. २५ सप्टेंबर :
बाणेर-औंध लिंक रोड हा शहरातील एक महत्त्वाचा मार्ग असून रोज हजारो वाहनांची ये-जा या रस्त्यावरून होत असते. ताम्हाणे चौक परिसरात मात्र मागील काही दिवसांपासून रस्त्याकडील झाडे अनियंत्रितपणे वाढल्यामुळे वाहनधारक व पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत होता. याशिवाय चौकाच्या परिसरात कचरा व घाण साचल्याने दुर्गंधी पसरत होती आणि परिसराच्या सौंदर्यावर परिणाम होत होता.
नागरिकांनी या समस्येबाबत वारंवार तक्रारी केल्या होत्या. परिस्थितीची गंभीर दखल घेऊन सौ. पूनम विशाल विधाते यांनी तातडीने पुढाकार घेत महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाशी समन्वय साधला. विभागाच्या कर्मचारी व स्थानिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने येथे झाडांची छाटणी करून रस्त्याचा अडथळा दूर करण्यात आला. तसेच चौक व रस्त्याच्या कडेला साचलेला कचरा, प्लास्टिक, घाण त्वरित उचलून नेण्यात आली.
स्वच्छतेच्या या कामामुळे ताम्हाणे चौक परिसराचा चेहरामोहरा बदलून तो अधिक स्वच्छ, आकर्षक व सुटसुटीत झाला आहे. पादचारी मार्ग मोकळा झाल्याने नागरिकांना सुलभतेने ये-जा करता येत आहे, तर वाहनधारकांनाही वाहतुकीत दिलासा मिळाला आहे.
“नागरिकांच्या सोयीसाठी परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवणे ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. स्वच्छतेतूनच आरोग्य सुधारते व परिसर राहण्यालायक होतो. नागरिकांनीही यासाठी प्रशासनासोबत सहकार्य करणे आवश्यक आहे,” असे मत सौ. पूनम विशाल विधाते यांनी व्यक्त केले.
या उपक्रमाचे स्थानिक नागरिकांनी स्वागत करत सौ. विधाते यांचे आभार मानले. “ताम्हाणे चौक परिसर स्वच्छ केल्याने आम्हाला मोठा दिलासा मिळाला आहे. अशी स्वच्छता नियमित व्हावी, हीच आमची अपेक्षा,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!