बाणेर :
बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे, पाषाण तसेच सोमेश्वरवाडी-सुतारवाडी या परिसरातील नागरिकांना वाढीव वीज बिलाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः नव्याने बसविण्यात आलेल्या मीटरमुळेच ही समस्या उद्भवत असल्याचे नागरिकांकडून निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चे कोथरूड विधानसभा कार्याध्यक्ष जयेश संजय मुरकुटे यांनी महावितरण कार्यालय, औंध येथे अतिरिक्त सहाय्यक अभियंता श्री. करपे यांची भेट घेऊन ही बाब मांडली.
नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन अधिक माहिती गोळा करून योग्य कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच चुकीच्या वीज बिल दुरुस्त करून देण्याबाबतही जयेश मुरकुटे यांनी महावितरण अधिकाऱ्यांकडे विशेष लक्ष घालण्याची विनंती केली.
👉 या पुढील काळातही नागरिकांना न्याय मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाणार असल्याचे कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे यांनी स्पष्ट केले.


More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!