सोमेश्वर वाडी :
पद्मभूषण वसंतदादा पाटील महापालिका शाळा क्र. ११जी, सोमेश्वर वाडी येथे विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानदीप प्रज्वलित करणारे आदर्श शिक्षक श्री. उनवणे सर यांचा सपत्नीक सेवापूर्ती सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सचिन दादा पाषाणकर व सचिन दळवी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्या म्हणून औंध विभागाच्या पर्यवेक्षिका संगीता शिरगावकर मॅडम उपस्थित होत्या. तसेच प्रशासन अधिकारी अरुणा रहिंग्ज मॅडम आणि पर्यवेक्षिका सुमन मेमाणे यांनीही शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलका केदारे यांनी तर प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा चौधरी यांनी केले. सरांचा परिचय सुवर्णा म्हमाणे यांनी करून दिला, तर कुसुम पारधी यांनी मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन मनिषा केतकर यांनी केले.
या प्रसंगी उपस्थित मान्यवर, शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून उनवणे सरांच्या शैक्षणिक व भावनिक कार्याचा गौरव केला. शाळेच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या कार्याचे मनापासून कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवाजी घुले सर, दिनेश लाटे, अश्विनी उनवणे तसेच शाळेतील सर्व शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
✨ सरांच्या सेवापूर्ती सोहळ्याने संपूर्ण वातावरण कृतज्ञतेने आणि भावनांनी भारावून गेले.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!