रायगड :
शनिवार दिनांक 20 सप्टेंबर २०२५ रोजी
रायगड किल्ला येथे पेरीविंकल च्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबवून पर्यटकांना व समाजाला एक आगळा वेगळा संदेश दिला. उपक्रमाचे उद्दीष्ट: इतिहासाची जाणीव, पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी वाढवणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट होते.
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या बावधन शाखेतर्फे तर्फे रायगड किल्ल्यावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला होता. मोहिमेत सुमारे १०० विद्यार्थी व १० शिक्षक सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांनी किल्ल्याच्या परिसरातील प्लास्टिक, कचरा व इतर घाण साफ करून परिसर स्वच्छ केला . याशिवाय, किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि गडाची सांस्कृतिक-सामाजिक ओळख याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनास हातभार लावला आणि इतिहासाबद्दलची आवड दृढ केली.
विद्यार्थ्यांनी सक्रियपणे स्वच्छतेचे काम केले आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव प्रदर्शित केली. उपस्थित विद्यार्थ्यांनी सांगितले, ‘‘गडावर स्वच्छता करताना आम्हाला खूप अभिमान वाटला’’. विद्यार्थ्यांनी उपक्रमादरम्यान इतिहास, संस्कृती आणि पर्यावरणाच्या महत्त्वाची ओळख घेतली.
विद्यार्थ्यांना शिक्षकांचे सतत मार्गदर्शन मिळाले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन, स्वच्छतेची सवय आणि सामाजिक जबाबदारी याबाबत माहिती दिली.
या संपूर्ण उपक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ रेखा बांदल ,शिवानी बांदल व शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते . कार्यक्रमाचे नियोजन हे मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांच्या अचूक मार्गदर्शनाखाली समन्वयक सायली गायकवाड व शिरीन काझी यांच्या सहकाऱ्याने उपक्रम प्रमुख शिक्षक राजश्री थोरात व राम जोगदंडे आणि सर्व उपस्थित शिक्षकवृंद आणि विद्यार्थीवर्ग यांच्या मदतीने अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. उपक्रमाचे उद्दिष्ट, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि सामाजिक संदेशाची महत्त्वता याबाबत सर्वांनाच कौतुक वाटले.
ही स्वच्छता मोहिम विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दलची जाणीव, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी याची समज वाढविण्यात यशस्वी ठरली. या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि व्यवस्थापन यांचे समन्वय साधला गेला आणि संपूर्ण मोहिमेत उत्साहपूर्ण सहभाग दिसून आला.



More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
“शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार घडले तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते” – मा. आमदार शरद ढमाले