सोमेश्वरवाडी –
सोमेश्वरवाडी येथील तुकाराम नगर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले. या परिस्थितीची तातडीने पाहणी करून भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल सरचिटणीस सचिन दळवी यांनी नागरिकांना धीर देत मदतकार्य सुरू केले.
माजी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. तातडीने करण्यात आलेल्या व्यवस्थेनुसार सर्व बाधित नागरिकांना सोमेश्वर वाडी येथील वसंत दादा पाटील शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आले असून, त्यांना आवश्यक असणारे अन्न, पाणी, निवारा व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या वेळी सचिन दळवी यांनी सांगितले की, “नागरिकांची अडचण हीच आमची जबाबदारी आहे. कुणालाही असुरक्षित वाटू देणार नाही, आवश्यक ते सर्व सहाय्य त्वरित पोहोचवले जाईल.”
स्थानिक नागरिकांनी वेळेत झालेल्या मदतीबद्दल सचिन दळवी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.



More Stories
*बावधन च्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सोनक टोयोटाच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण जनजागृती व वृक्षारोपण अभियान उत्साहात संपन्न!!!*
*ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरा*
“वीज सडक पाणी” प्रश्न, बालेवाडी वेलफेअर फेडरेशनने मांडला महाराष्ट्राच्या मंत्रालयात.