बाणेर :
बाणेर-बालेवाडी परिसरातील स्वच्छतेसाठी शिवम बालवडकर (युवा नेते, भाजपा) यांनी हाती घेतलेले “मिशन स्वच्छ ग्रीन बाणेर-बालेवाडी” हे अभियान वेगाने पुढे सरकत आहे.
आज राम इंदू पार्क, बाणेर येथील लेन-६ मध्ये अनेक दिवसांपासून रस्त्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात होता. या समस्येबाबत नागरिक वारंवार भाजपा जनसेवा कार्यालयाशी संपर्क साधत होते. या तक्रारींवर सकारात्मक पाऊल उचलत आज प्रत्यक्ष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
या उपक्रमाबाबत बोलताना शिवम बालवडकर म्हणाले,“बाणेर-बालेवाडी स्वच्छ व हरित ठेवण्याचा माझा दृढ निश्चय आहे. त्यामुळे आठवड्यातले दोन दिवस मी पूर्णपणे नागरिकांसाठी आणि परिसरातील स्वच्छतेसाठी देणार आहे. हे काम केवळ कचरा साफ करण्यापुरते मर्यादित नसून, नागरिकांमध्ये स्वच्छतेची सवय आणि जबाबदारी निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे.”
या मोहिमेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून परिसर स्वच्छ, हिरवा आणि सुंदर करण्यासाठी अनेकजण पुढाकार घेत आहेत.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी