बाणेर :
बाणेर परिसरातील ननवरे चौक ते पॅन कार्ड क्लबकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली असून, या उपक्रमाबद्दल नागरिकांकडून समाधान आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.
आज सकाळी ९ वाजता सुरू झालेले हे काम सायं. ७ वाजेपर्यंत चालले. या दरम्यान जवळील विविध सोसायट्यांतील नागरिकांनी प्रत्यक्ष भेट देऊन कामाबाबत समाधान व्यक्त केले.
नागरिकांनी कौतुकाच्या शब्दांत प्रतिक्रिया देताना म्हटलं – “बाबुरावजी आणि समीर भाऊ… आमची मागणी ओळखून तुम्ही केलेला पाठपुरावा आणि आज प्रत्यक्षात सुरु झालेलं हे काम पाहून आम्हाला खरोखरच आनंद होतोय. ट्रॅफिक फ्री ननवरे चौकाचं वचन आज प्रत्यक्षात साकारताना पाहून आम्हाला मोठा दिलासा मिळालाय.”
या कामाच्या शुभारंभी पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष मा. बाबुरावजी चांदेरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुल दादा बालवडकर व युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर समीर चांदेरे प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित होते.
समीर चांदेरे यांनी नागरिकांचे आभार मानताना सांगितले की, “या रस्त्याच्या कामासाठी सातत्याने मनपा आयुक्तांकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यावेळीही सोसायटीतील रहिवाशी माझ्यासोबत होते आणि आज प्रत्यक्ष काम सुरू झाल्यापासून ते आमच्यासोबत आहेत. त्यामुळे या कामाचे संपूर्ण श्रेय नागरिकांना जाते. त्यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले. आम्ही सदैव प्रभागातील नागरिकांच्या प्रत्येक समस्येवर कटिबद्ध आहोत आणि राहू.”



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी