बाणेर :
बाणेरकरांसाठी एक मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. गेली अनेक वर्षं रखडलेला २४ मीटर डीपी रस्ता – ननावरे ब्रिज ते न्यू पॅनकार्ड क्लब रोड मिसिंग लिंक अखेर मार्गी लागला असून या रस्त्याचे काम सुरू होत आहे.
या रस्त्याच्या कामामुळे बाणेरमधील वाहतुकीवर मोठा सकारात्मक परिणाम होणार आहे.
👉 हायवेच्या पूर्व-पश्चिम मार्गावरील ट्रॅफिक सुरळीत होणार
👉 बिटवाईज चौक व राधा चौकावरील वाहतूक कोंडी कमी होणार
👉 नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला दिलासा मिळणार
👉 बाणेर परिसराच्या विकासाला गती मिळणार
या महत्वाच्या प्रश्नाचा तोडगा निघवण्यासाठी सतत प्रयत्न करणारे मा. कॅबिनेट मंत्री, आमदार श्री. चंद्रकांतदादा पाटील यांचे स्थानिक नागरिकांकडून मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत. तसेच या रस्त्याच्या कामासाठी सहकार्य करणारे मुरकुटे परिवार आणि बाफना बिल्डर्स यांचे विशेष आभार मानण्यात आले आहेत.
बाणेरकरांच्या दीर्घ प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळणार असून या रस्त्याच्या माध्यमातून परिसरातील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे.
— भाजपा नेते गणेश कळमकर



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी