पाषाण :
सुसखिंड परिसरातील नागरिकांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. मा. कॅबिनेट मंत्री आणि आमदार श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या आदेशानुसार नॅशनल हायवे अथॉरिटी आणि पुणे ट्रॅफिक पोलिस विभागाने तत्पर कार्यवाही करत सुस खिंड येथील लोखंडी डिव्हायडर हटवला.
या निर्णयामुळे पाषाण – सुतारवाडी तसेच सुस परिसराकडे जाण्यासाठी नव्या व सोयीस्कर मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे परिसरातील नागरिक व वाहनचालक यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या निर्णयाचे परिणाम
• दररोज होणारी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होणार
• वाहनचालकांना सुलभ आणि जलद प्रवासाचा अनुभव मिळणार
• नागरिकांचा वेळ व इंधनाची लक्षणीय बचत होणार
यावेळी बाणेर, पाषाण वाहतूक शाखेचे प्रमुख डोंगरे साहेब, कोथरूड विधानसभा उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, सरचिटणीस सचिन दळवी, अस्मिता करंदीकर, उमा गाडगीळ, सचिन सुतार, विवेक मेथा उपस्थित होते.
स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून प्रशासन, लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मिळालेलं हे यश असल्याचे मत व्यक्त केले.
“वाहतूक कोंडीमुळे दैनंदिन प्रवास त्रासदायक झाला होता. लोखंडी डिव्हायडर हटवल्याने आता आम्हाला मोठा दिलासा मिळाला आहे,” असे एका रहिवाशाने सांगितले.
नागरिकांनी मा. चंद्रकांतदादा पाटील, नॅशनल हायवे अथॉरिटी आणि पुणे ट्रॅफिक पोलिस विभाग यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!